भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ कुडाळात निघाली तिरंगा रॅली…
कुडाळ
“भारत माता कि जय… वंदे मातरम… ” अशा घोषणा देत आणि हाती तिरंगा फडकवत आज कुडाळ शहरात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दल आणि सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली. भर पावसात निघालेल्या या तिरंगा सन्मान यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यानी भारतातील निष्पाप नागरिकांवर हल्ला केल्याने या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पराक्रम गाजवत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. भारतीय सैन्याच्या या पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी आज सायंकाळी कुडाळ शहरात राजमाता जिजाऊ पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. राजमाता जिजाऊ याना पुष्पहार अर्पण करून भारतमाता कि जयच्या घोषणा देत रॅलीला सुरुवात झाली. कुडाळ शहराच्या मुख्य रस्त्यावरून भर पावसात रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे येऊन विसर्जित झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि घोषणा देण्यात आल्या.
या रॅलीत संजय वेंगुर्लेकर, संध्या तेरसे, बंड्या सावंत, राजू राऊळ, राजू बक्षी, सौ अदिती सावंत, सौ आरती पाटील, सौ संध्या तेरसे, सौ विशाखा कुलकर्णी, सौ प्रज्ञा राणे, माजी नगराध्यक्ष सौ आफरीन करोल, माजी नगराध्यक्ष सौ अक्षता खटावकर, सौ श्रेया गवंडे, सौ सायली जळवी, सौ मुक्ती परब, सौ तेजस्विनी वैद्य, सौ चैत्राली पाटील, सौ अंजली वालावलकर, सौ अंजली मुतालिक, कुमारी आस्था सावंत, सौ अक्षता कुडाळकर, रमा नाईक, डॉक्टर अभय सावंत, वैद्य सुविनय दामले, द्वारकानाथ घुर्ये, बबन घुर्ये, प्रसाद शिरसाठ, निलेश परब, राजू बक्षी, प्रख्यात काणेकर, भोलानाथ कोचरे, के एल फाटक, संजय भोगटे, स्वरूप वाळके, अविनाश पाटील अन्वय मुतालिक, विवेक मुतालिक, चंदू पटेल, जयंती पटेल, जयवंत बिडये, राजू पाटणकर, भाई म्हापणकर, समीर सावंत, अनंत गावकर, रमेश राणे, उदय आहेर , विवेक बोभाटे, काशिनाथ निकम, सडवेलकर व देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.
