You are currently viewing द्रवनत्र वाहतुकीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

द्रवनत्र वाहतुकीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

द्रवनत्र वाहतुकीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी,

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, कणकवली या कार्यालयाकडून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना महिन्यातून एकदा द्रवनत्र रेतमात्रा इत्यादीची पुरवठा वाहतूक करण्यासाठी एक वर्षाचा भावबंद करार कालावधीसाठी खाजगी वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. समीर बिलोलीकर यांनी दिली आहे.

हे दरकरार दिनांक १ एप्रिल २०२५ ते दिनांक ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी असुन तरी इच्छुक पुरवठादार यांनी आपली दरपत्रके दिनांक २२ मे २०२५पर्यंत मागविण्यात आलेली होती. काही दरकराराच्या प्रक्रीयेसाठी फक्त एक दरपत्रक लिफाफा आल्याने या प्रक्रीयेस पुन्हा मुदतवाढ देण्यात येत असून दरपत्रके दि. २ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोहोरबंद लिफाफ्यात सादर करावी. दरपत्रके दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग येथे नियुक्त समिती समोर उघडण्यात येतील व वाहतुकीचा कमीत कमी दर नमूद केलेल्या पुरवठादार यांना पुरवठा आदेश देण्यात येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाचे दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८०८ किंवा ई-मेल पत्ता वर ddcahsindhudurg@gmail.com संपर्क साधावा.

या बाबतचा तपशील कार्यालयाच्या तांत्रिक शाखेत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

अ.क्र. कामाचे नाव तपशील वाहनाचा प्रकार व क्षमता
1. जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, कणकवली सिंधुदुर्ग व जिल्ह्यातील इतर पशुवैद्यकीय संस्थांना लागणारे द्रवनत्र तसेच पुणे येथुन विर्यमात्रा उचल व इतर वाहतुकीची अनुषंगिक कामे. मासिक फ़िरती अंदाजे 1800 – 1900 किमी T.A. 55 आकारची 20-25 द्रवनत्र पात्रे बसतील अश्या क्षमतेचे वाहन किंवा तत्सम प्रकाराचे

दरपत्रके सादर करताना अधिकृत लेटर हेड वरच सादर करावेत,  दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात सादर करावे,  दरपत्रके 10 दिवसांच्या आत सादर करावे, दर सर्व करासहित असावेत, GST प्रमाणपत्रदरपत्रकासोबत सादर करावे व वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे, आधार कार्ड, PAN कार्डसोबत सादर करावेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा