भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मालवणात निघाली तिरंगा रॅली…
मालवण
भारत माता कि जय… वंदे मातरम… अशा घोषणा देत आणि हाती तिरंगा फडकवत आज मालवण शहरात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दल आणि सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या सैनिकांना व दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यानी भारतातील निष्पाप नागरिकांवर हल्ला केल्याने या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पराक्रम गाजवत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. भारतीय सैन्याच्या या पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी आज सकाळी मालवण शहरात भरड नाका ते मालवण बंदर जेटी अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. भारताचा व भारतीय सैन्याचा जयघोष करत बाजारपेठेतून निघालेल्या या रॅलीचे विसर्जन बंदर जेटी येथे झाले. यावेळी ऑपरेशन सिंदूर मध्ये शहिद झालेल्या सैनिकांना तसेच दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या रॅलीत अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, भाऊ सामंत, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, सहदेव साळगावकर, संदीप परब, पूजा करलकर, पूजा सरकारे, रोहिणी दिघे, तारका चव्हाण, अमिता न्हीवेकर, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, महेंद्र चव्हाण, विजय निकम, ललित चव्हाण, दादा वेंगुर्लेकर, संतोष लुडबे, मिलिंद झाड, श्रीराज बादेकर, केदार झाड, रत्नाकर कोळंबकर, संदीप बोडवे, दर्शन वेंगुर्लेकर, सूर्यकांत फणसेकर आदी तसेच इतर नागरिक व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
