सर्पदंश रुग्णांच्या प्रमाणात वाढ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांवर यशस्वी उपचार -रवी जाधव.
सावंतवाडी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून दररोज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रात्री 9 ते 12:30 पर्यंत विनामूल्य सेवा पुरवली जाते. या सेवेमध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम रात्रीच्या वेळी तर सकाळच्या सत्रामध्ये रूपा मुद्राळे, हेलन निबरे, समीरा खलील व अन्य कार्यकर्त्यांकडून सेवा पुरवली जाते.शहर किंवा शहराबाहेरील निराधार व अन्य अपघातग्रस्त रुग्णांना संस्थेकडून सहकार्य केले जाते. परंतु सध्याच्या अवकाळी पावसामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश होऊन रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यासाठी स्वतःची योग्य ती काळजी घ्या काळोखात व अडचणीच्या ठिकाणी काळोखामध्ये बॅटरीचा वापर करावा, झोपताना अंथरून झाडून घालावे शक्यतो खाली झोपणे टाळावे.
सर्पदंश झाल्यावर काय कराल-
1) सर्पदंश झालेला अवयव स्थिर ठेवा व हालचाल कमीत कमी होण्यासाठी लाकडी पट्टीचा आधार घ्यावा.
2) एखादं वाहन उपलब्ध झालं नसेल तर तत्काळ 108 ला कॉल करून लवकरात लवकर नजदीकच्या दवाखान्यांमध्ये घेऊन जावे तसेच दंश केलेल्या सरपटणाऱ्या प्राण्याचा फोटो काढावा किंवा त्याचे वर्णन डॉक्टरांना सांगावे जेणेकरून योग्य इलाज करता येईल.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा कुठच्याही संकटामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आपल्या सेवेसाठी नेहमी सतर्क असेल.
