You are currently viewing सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती शिक्षण संस्था कसाल या संस्थेचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती शिक्षण संस्था कसाल या संस्थेचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती शिक्षण संस्था कसाल या संस्थेचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती शिक्षण संस्था कसाल या संस्थेचा १५ व्या वर्धापन दिनानिमित्त अपंग मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय कसाल येथे आयोजित करण्यात आला.संस्था अध्यक्ष श्री.अनिल शिंगाडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कसाल गावचे सरपंच श्री.राजन परब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या आजपर्यंतच्या संपूर्ण कार्याचा अहवाल वाचन करून माहिती देण्यात आली.भविष्यातील संस्थेच्या धेय्य धोरणाविषयी माहिती देण्यात आली. दिव्यांगांना असणा-या सेवा सुविधा, शासकीय योजनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या सिंदुर मोहिमेत विजयाचा जयघोष तसेच सैनिकांप्रती आदर भावना व्यक्त करण्यासाठी कसाल बस स्थानक ते कसाल ग्रामपंचायत कार्यालय दरम्यान रॅली काढण्यात आली.श्री.सचिन परब व रंजना इंदुलकर यांनी दिव्यांग बांधवांसाठी प्रथम उपस्थिती दाखवून आनंद व्यक्त केला.सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री. सतिश बागवे यांचा देखील सहभाग लाभला.अध्यक्षिय भाषणातून श्री. राजन परब यांनी दिव्यांगाच्या प्रती आदर भावना व्यक्त करत आपण दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्परतेची ग्वाही दिली. संस्था स्थापन करणे सोपे आहे पण ती चालवणं हे खूप कठीण आहे पण शिंगाडे सर यांनी या लहान वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर करून हि संस्था पंधरा वर्षे यशस्वीरित्या चालवून आज प्रगतीपथावर नेऊन ठेवली आहे.असेच महान कार्य उत्तरोत्तर त्यांच्या हातून होतं जाईल असे उदगार काढले.या कार्यक्रमामध्ये संस्था अध्यक्ष श्री.अनिल शिंगाडे सर यांचा ४९ वा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच इयत्ता दहावी परीक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमास कसाल बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. कदम तसेच कसाल पोलिस पाटील श्री.कदम तसेच समाजातील विविध स्तरातील लोकांना समुपदेशन करणा-या सौ. वालावलकर सौ.खरात श्री.प्रशांत कदम, डॉ.आरोसकर, श्री.लोटे,श्री.राऊळ, श्री. सुनील तांबे , श्री. राजेंद्र मेस्त्री आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.दयानंद गावकर यांनी केले.तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे सर यांनी केले.

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓

*_डी जी बांदेकर ट्रस्ट मध्ये ऍडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा…._*

सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि *एक वर्ष फाउंडेशन कोर्स*

_होय… आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही…_

_आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका._

_मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स_

_यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…_

_👉विशेष म्हणजे फाउंडेशन कोर्स साठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही._

_शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी_
_प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…_
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर शनिवार आणि रविवार *आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस*

*(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)*

_चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…_

*अधिक माहितीसाठी*👇

*तुकाराम मोरजकर*
*📲9405830288*

*सिद्धेश नेरुरकर*
*📲9420260903*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/166251/

https://www.facebook.com/share/p/1FMLVgkauT/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा