*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कवितेचं पीक*
आभाळात ढग यावेत
तसे विचार येत गेले मनात.
आणि कविता होऊन
उतरत गेले
कागदावर.
अनेक होते विचार.
काही होते अनुभव.
काही जाणीवा.
सगळ्यांची होत होती
डोक्यात सरमिसळ.
आणि आकारत होत्या
कविता.
पावसाच्या, पाण्याच्या,
शेतीच्या,मातीच्या,
डोंगराच्या,सागराच्या,
रानाच्या,पानांच्या,
पशूंच्या, पक्ष्यांच्या,
ताऱ्यांच्या,वाऱ्यांच्या,
कविताच कविता
जणू कोसळत होता
कवितांचा पाऊस!
आता सगळ्या कविता
डौलात उभ्या आहेत.
जणू रानात असलेलं
भरदार पीक!
अनुपमा जाधव, डहाणू

