तब्बल तीन दिवस बंद असलेली शिवापूर, वसोली, अंजिवडे वाहतूक पुन्हा सुरू…
निलेश राणेंचा यशस्वी पाठपुरावा; जुना पूल तात्पुरता खुला करून प्रश्न निकाली…
कुडाळ
अवकाळी पावसामुळे दुकानवाड येथील पूलाचे काम अर्धवट असल्यामुळे गेले तीन दिवस बंद असलेली वाहतूक आज अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बाजूला असलेला जुना पूल खुला करण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तात्काळ हे काम करण्यात आले. त्यामुळे त्याचा फायदा आंजिवडे, दुकानवाड, शिवापूर, वसोली या गावांना होणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी राणे यांचे आभार मानले आहे.
शिवापूर, वसोली, आंजिवडे, दुकानवाड, साकिर्डे, अशा गावांना जोडणारा पूल दुकानवाड येथे बांधला जात असताना पावसाच्या आगमनामुळे अर्धवट राहिला. त्यामुळे पुढे जाणारी वाहतूकच खोळंबली. जुना असलेला पूल गाळाने भरला होता. त्यामुळे त्यावरून पाणी वाहत होते. तो वापरणे योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आमदार निलेश राणे यांनी तो पूल मोकळा करून वाहतूकीस योग्य करा, अशा सूचना दिल्या आणि जुना वापरता असलेला पूल तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणच्या वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला. दरम्यान या भागातील विजेचा ही प्रश्न सोडविण्यात आला. वीज सुरू करण्यात आली. मोबाइल टॉवरला रेंज सुद्धा सुरू करण्यात आली आहे.
