रत्नागिरी, सिंधुदुर्गला 29 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट
मुंबई :
मे महिना संपण्याआधीच कोकणासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस 20 मे पासूनच पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु 24 तारखेनंतर ही स्थिती निवळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु हा उरलेला मे महिना पावसातच जाणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झाले.
भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तळ कोकणातील दोन जिल्ह्यांना 29 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाबरोबरच विजांचा कडकडाट सुद्धा होण्याची शक्यता असून समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे हा उरलेला संपूर्ण मे महिना पावसाचाच असेल हे आता स्पष्ट झाले.
दरम्यान केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यामुळे येत्या सहा ते सात दिवसात हा मान्सून कोकणात सुद्धा दाखल शक्यता असून सुरू झालेला हा पावसाळा पुढे असाच कायम राहील असेही आता दिसून येत आहे.
