*बांदा केंद्र शाळेतील स्वरा बांदेकर व अंकिता झोळची सातारा सैनिक स्कूलसाठी निवड*
*बांदा*
शालेय वयातच विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शिस्त,शारीरिक प्रशिक्षण, संरक्षण सेवा यांचे प्रशिक्षण देऊन भविष्यात लष्कर,नौदल व हवाई दलात भरती होऊ शकतील या हेतूने भारतात सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेल्या सातारा सैनिक स्कूल येथे पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेतील स्वरा दिपक बांदेकर व अंकिता शाहू झोळ या दोन विद्यार्थीनींची इयत्ता सहावी इयत्तेतेसाठी सातारा सैनिक स्कूल येथे निवड झाली आहे.
५एप्रिल २०२५रोजी ही परीक्षा देशभरात संपन्न झाली होती .स्वरा बांदेकर व अंकीता झोळ यांनी गोवा राज्यातील ओल्ड गोवा येथून ही परीक्षा दिली होती .या परीक्षेला दोघींची निवड झाल्याबद्दल बांदा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्षा संपदा सिध्दये यांनी अभिनंदन केले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षक रंगनाथ परब,जे.डी.पाटील , फ्रान्सिस फर्नांडिस,स्नेहा घाडी, जागृती धुरी,कृपा कांबळे, मनिषा मोरे, सुप्रिया धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
