मालवण:
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी दुपारी ठीक साडेतीन वाजता डॅफोडील्स रिसॉर्ट आचरे या ठिकाणी आयोजित केली आहे. सदर सभेला सर्व सदस्यांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन श्री सुरेश शा. ठाकूर (अध्यक्ष) आणि श्री अनिरुद्ध आचरेकर (कार्यवाह) कोमसाप मालवण यांनी केले आहे.
सदर सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन, जमा खर्च अहवाल वाचन (२०२४-२५), नवीन कार्यकारणी निवड २०२५ ते २८, चालू वर्षीच्या कार्यक्रमाचे नियोजन आदी विषयांवर चर्चा होणार आहे
सभेला मार्गदर्शन करण्यासाठी श्री मंगेश मस्के (जिल्हाध्यक्ष) तसेच रुजारिओ पिंटो (केंद्रीय प्रतिनिधी) उपस्थित राहतील. तरी सदर सभेला सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे, असे आवाहन सुरेश ठाकूर यांनी केले आहे.
