*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”मधमाशी”*
मधमाशी मनुष्यास सृष्टीचे अलौकिक देणं
दत्तगुरूंनी मानले माशीला गुरु समानIIधृII
मधमाशीला आहेत चार पंख सहा पाद
स्पर्श संवेदी केस संयुक्त नेत्र साधे नेत्र
रुची इंद्रिय ज्ञानेन्द्रिय असतात मुखांतII1II
निसर्ग साखळीतील कीटक आहे अद् भूत
मध बनवण्यासाठी खाण्यासाठी दोन पोट
शिकवे अमृत संचय एक निष्ठेनं समर्पणII2II
मधमाशांमुळे नैसर्गिक होते परागीभवन
कृषक सर्वांचे मैत्र वाढवे कृषी उत्पादन
चराचरा पासून तिचे अस्तित्व पुरातनII3II
चोखती गोड रस सर्वथा देती शुद्ध मध मेणं
ऊर्जा दाती गुणकारी आयुर्वेदिक औषध
मध आरोग्य दायी आहे नैवेद्यातील अमृतII4II
निरंतर गोळा करी मध राखी पर्यावरण
शिकवे संचयाचे महत्त्व निष्ठेन समर्पण
राहू कृतज्ञ करू जतन संवर्धन संगोपनII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410301.Cell.9373811677
