शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन
सिंधुदुर्गनगरी
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन माहे मे व जून 2025 मध्ये करत असल्याचे अवगत करण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ही परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
ही परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहे, त्यामुळे परीक्षार्थ्यांनी युट्युब चॅनेल्स व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या/अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट व्यतीरिक्त अन्य माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे विद्याथ्यांचे उमेदवारांचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे कार्यालय जबाबदार असणार नाही, तरी विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळाला अधिकृत संकेतस्थळला भेट द्यावी, असेही श्रीमती ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

