कुडाळमध्ये १३ जुलै रोजी मॉन्सून हाफ मॅरेथॉन स्पर्धा…
राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सूनचे आयोजन
कुडाळ
राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन २०२५ च्या वतीने पावसाळी भव्य हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १३ जुलै २०२५ रोजी हि स्पर्धा कुडाळ येथे होणार आहे. एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था येथून या मॅरेथॉनला सुरूवात होणार आहे. Every Running Step Makes Your Heart Stronger या टॅगलाईन खाली ५, १०, १६(JR10) व २१ किलोमीटर या गटात हि मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्गासह मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी इथून धावपटू सहभागी होणार आहेत. या हाफ मॅरेथॉनचे यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मान्सून रन २०२५ सज्ज असल्याची माहिती टीम कुडाळ मान्सून रनच्या वतीने राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डाॅ.जी.टी.राणे यांनी दिली.
कुडाळ येथील हाॅटेल स्पाइस कोकण येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत टिम कुडाळ मान्सून रनच्या वतीने या हाफ मॅरेथॉनची माहीती देण्यात आली. यावेळी डॉ. जी. टी. राणे, गजानन कांदळगावकर, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. प्रशांत सामंत व सचिन मदने उपस्थित होते.
डाॅ.राणे व कांदळगावकर म्हणाले, कुडाळ येथे गेल्यावर्षी टिम मान्सून रनच्या वतीने पहिल्यांदाच मान्सून हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यात ७५० हून अधिक धावपटू सहभागी झाले होते. चांगल्या प्रकारे ही मॅरेथॉन पार पडली. या सन २०२४ वर्षातील सर्वोत्कृष्ट हाफ मॅराथाॅन आयोजनाबद्दल मुंबई रोड रनर्स संस्थेकडून ट्राॅफी देऊन कुडाळ मॉन्सून रन २०२४ ला सन्मानित करण्यात आले आहे. पहिल्याच प्रयत्नात मान्सून रनचा झालेला मानाचा सन्मान हा आमच्यासाठी मोठा अभिमान असून यंदाची ही दुसरी मान्सून मॅरेथॉन आहे.
आरोग्यसाठी चालणे किंवा धावणे हे महत्त्वाचे आहे. व्यायाम व आरोग्य या बद्दलची जनजागृती व्हावी यासाठी आपले हृदय चालत राहावे, यासाठी आपण चालत राहा, हा मोलाचा संदेश घेऊन हि पावसाळी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसह सिंधुदुर्ग सायक्लीस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉक्टर्स डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब,सिंधुदुर्ग यांचे ज्येष्ठ सदस्य टीम मॉन्सून रन या नावाने उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सज्ज झाले आहेत. या मॅरेथॉनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी होणार आहे. बील लाॅन मेडल पुरस्कार प्राप्त प्रसाद कोरगावकर, काॅम्रेड मॅरेथॉन ब्रान्झ मेडल प्राप्त ओमकार पराडकर, रत्नागिरीचे आयरन मॅन डॉ. तेजानंद गणपत्ये, मुंबईतील आयरन मॅन अरविंद सावंत हे प्रसिद्ध धावपटू यात सहभागी होणार आहेत.
कुडाळ एमआयडीसी येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्था मैदानावरून सुरू होणारी ही मॅरेथॉन नेरूर मार्गे वालावल श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथून नदीपर्यंत जाईल व तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल. ५ कि.मीची फन रेस असणार आहे. यामध्ये रोख बक्षिस नसणार आहे. पण टी शर्ट व डिजीटल सर्टिफिकेट दिले जाणार आहे. १० कि.मी., १६ कि.मी. व २१ कि.मी. प्रकारात वयोगटानुसार रोख बक्षिसे व खुल्या गटासाठीही रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार असून खुल्या गटातून तसेच वयोमानाप्रमाणे आखलेल्या गटांमधून प्रथम दोन धावपटूंनाही रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट दिले जाणार आहेत. डाॅ.जयसिंग रावराणे यांनी गतवर्षी ही मॅरेथॉनची संकल्पना पुढे आणली. त्यामुळे त्यांचा गौरव म्हणून जेआर १० मैल (१६कि.मी.) हि मॅरेथॉन वाढवण्यात आली आहे. गतवर्षी झालेली मॅरेथॉन चांगल्या प्रकारे यशस्वी झाली. यावर्षीही मोठ्या संख्येने जिल्ह्यातील नागरीक व धावपटूंनी सहभाग घेऊन मॅरेथॉनचा आनंद लुटावा. नावनोंदणीसाठी आयोजकांशी 9421261212 संपर्क साधावा किंवा www.ranehospital.net या संकेतस्थळावरून नाव नोंदणी करावी, असे आवाहनही डाॅ.राणे यांनी यावेळी केले.
कांदळगावकर म्हणाले, गतवर्षीपासून पावसाळी मॅरेथॉन कुडाळ येथे आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या मॅरेथॉनना गतवर्षी मोठा प्रतिसाद मिळाला. यंदाचे या मॅरेथॉनचे दुसरे वर्ष आहे.
डाॅ.सामंत म्हणाले, ही कमर्शिअल मॅरेथॉन नाही. तरीही आम्ही इंटरनॅशनल पातळीवरच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहोत. यात ऑन रोड 3 रूग्णवाहिका, सोबत डाॅक्टर्स, तसेच मदतीसाठी स्वयंसेवक उपस्थित असणार आहेत. मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर फिजिओथ
