You are currently viewing प्रविण गवस यांची मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड…

प्रविण गवस यांची मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड…

प्रविण गवस यांची मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड…

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेले आणि सरपंच सेवा संघाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांची पीएसआर मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यांमधील त्यांची निष्ठा आणि समर्पण भावनेमुळे त्यांची ही निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या नवीन जबाबदारीबद्दल बोलताना श्री. गवस म्हणाले की, सरपंच सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतानाच, मानवाधिकार संघटनेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी नक्कीच न्याय देईन.

प्रतिक्रिया व्यक्त करा