You are currently viewing कणकवली तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर…!

कणकवली तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर…!

तालुक्यातील ६३ पैकी ३१ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव…!

कणकवली

कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीचे सरपंचपदाचे आरक्षण आज जाहिर करण्यात आले. तालुक्यातील ६३ पैकी ३१ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यात अनुसूचित जातीसाठी ५ ग्रामपंचायती राखीव असून त्यातील २ महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी १ असून ती महिलांसाठी, नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायती असून त्यातील ८ महिलांसाठी तर खुल्या प्रवर्गातील ४० पैकी २० ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

मातोश्री मंगल कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीवेळी तहसीलदार आर.जे.पवार, निवासी नायब तहसीलदार सुजाता पाटील, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत झाली.

अनुसूचित जाती ५ जागा- अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तरंदळे, कसवण तळवडे व जानवली तर अनुसूचित जाती महिलांसाठी ओटव व नागवे या २ ग्रामपंचायती आरक्षीत झाल्या. अनुसूचित जमातीसाठी एक- ती महिलांसाठी तालुक्यातून अनुसूचित जमाती महिलांसाठी हळवल ही ग्रामपंचायत आरक्षीत करण्यात आली. नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ जागा- यातील ८ महिलांसाठी आरक्षीत करण्यात आल्या. नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षीत जागांमध्ये नांदगाव, पियाळी, डामरे, गांधीनगर, कळसुली, कोळोशी , करंगवणे – बेर्ले, असलदे, शिवडाव नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीवसाठी- दारूम, भिरवंडे, करूळ, कुंभवडे, पिसेकामते , सातरल , शेर्पे व वायंगणी . सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४०- यातील २० महिलांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण- सर्वसाधारण प्रवर्ग लोरे , बेळणेखुर्द , भरणी , चिंचवली , दिगवळे , घोणसरी , आशिये , हरकुळ खुर्द , कोंडये , नाटळ , साकेडी , साळीस्ते , शिडवणे , तळेरे , तिवरे , हरकुळ बुद्रुक , वागदे , कलमठ , सांगवे व नरडवे . सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी- माईण , वारंगाव , कासार्डे , वाघेरी , आयनल , दारिस्ते , ओझरम , सावडाव , नडगिवे , तोंडवली – बावशी , वरवडे , बोर्डवे , हुंबरठ , बिडवाडी , कासरल , खारेपाटण , शिरवल , फोंडाघाट , ओसरगांव व करंजे असे आरक्षण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा