You are currently viewing पुढील दोन दिवस पावसाचा जोर, नागरिकांनी सतर्क राहावे – निलेश राणे

पुढील दोन दिवस पावसाचा जोर, नागरिकांनी सतर्क राहावे – निलेश राणे

पुढील दोन दिवस पावसाचा जोर, नागरिकांनी सतर्क राहावे – निलेश राणे

जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे आवाहन….

कुडाळ

मान्सूनपूर्व पावसाने कोकणात थैमान घातले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. २३ आणि २४ मे ला संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आरोग्य आणि बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असा सल्ला आमदार निलेश राणे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा