You are currently viewing रायगड युवा महोत्सवात कोकणनामा चे संपादक श्री उमाजी केळुसकर यांचा शिवरत्न भूषण पुरस्कारांनी सन्मान!

रायगड युवा महोत्सवात कोकणनामा चे संपादक श्री उमाजी केळुसकर यांचा शिवरत्न भूषण पुरस्कारांनी सन्मान!

रायगड युवा महोत्सवात कोकणनामा चे संपादक श्री उमाजी केळुसकर यांचा शिवरत्न भूषण पुरस्कारांनी सन्मान!

लोणारे (अलिबाग),

संस्थापक, अध्यक्ष रोहित राजेंद्र पाटील यांच्या शिवप्रेमी सामाजिक संस्था, लोणारेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जल्लोष तरुणाईचा ‌‘रायगड युवा महोत्सव २०२५’ रविवार, १८ मे २०२५ रोजी लोणारे येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मोठ्या थाटामाटात पार पडला. या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवलेल्या रायगड जिल्ह्यातील युवा आणि अनुभवी मान्यवरांना ‌‘शिवरत्न भूषण पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले. हा यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
पुरस्कार वितरणाच्या प्रारंभी महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या धमाकेदार नृत्याची पेशकश झाली
या प्रतिष्ठित सोहळ्यात विविध क्षेत्रांतील ११ गुणवंत व्यक्तींना ‌‘शिवरत्न भूषण पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले. .
आपल्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून साहित्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे साहित्यिक आणि साप्ताहिक कोकणनामा चे संपादक श्री उमाजी केळुसकर यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.त्यांना शिवरत्न भूषण पुरस्कार २०२५’ ने गौरविण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील पत्रकार आणि संपादक यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा