ग्रामस्थांच्या मदतकार्यामुळे मळगावात दोन दिवसांनी वीजपुरवठा पूर्ववत…
सावंतवाडी
मान्सूनपूर्व पावसामुळे मळगाव-वेत्ये रोडवरील जांभळीच्या गाळ परिसरात विद्युत पोल उन्मळून पडल्याने गेल्या दोन दिवसांपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतू ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे दोन दिवसांनी आज वीज पुरवठा सुरळीत झाला. त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले. तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय धुरी यांनी संपर्क साधला आणि तातडीने लाईनमन पाठवण्याची विनंती केली.
गावात महावितरणचे दोन कर्मचारी कार्यरत असूनही, वीजपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना मदत करत सर्व यंत्रसामग्री गोळा केली आणि आडवा झालेला विद्युत पोल पुन्हा उभा करून वीजपुरवठा सुरू केला. यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय धुरी, एकनाथ गावडे, मंगेश राऊळ, विलास राऊळ, मनोज रेडकर, सुरेश गावडे, प्रकाश साळगावकर, श्री. इंगळे या ग्रामस्थांसह वायरमन संतोष गावकर आणि श्री. हळदणकर यांनी भर पावसात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न केले.
