You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याला “ऑरेंज अलर्ट”, वादळी पावसाची शक्यता – अनिल पाटील

सिंधुदुर्ग जिल्ह्याला “ऑरेंज अलर्ट”, वादळी पावसाची शक्यता – अनिल पाटील

सिंधुदुर्ग जिल्ह्याला “ऑरेंज अलर्ट”, वादळी पावसाची शक्यता – अनिल पाटील

आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज…

सिंधुदुर्गनगरी

उत्तर कर्नाटक-गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने “ऑरेंज अलर्ट” जारी केला आहे. जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तरीही प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा