You are currently viewing नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करण्याचे आवाहन

नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करण्याचे आवाहन

नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

शासनाच्या नागरी संरक्षण संचानालयाच्या 9 मेच्या  आदेशानुसार  देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी, भरती करण्याचे निश्चित आहे. जेणे करुन माजी सैनिकांचा सैन्यातील अनुभवाचा वापर संघटनेला होऊ शकतो आणि त्यामुळे नागरी संरक्षण दलाचे कार्य अधिकच जलद गतीने  होण्यास मदत होईल.

            जिल्ह्यातील माजी सैनिकांनी त्यांचे सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक 25 मे 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबतचा आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी  क्र. 02362 228820, 9322051284 वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा