You are currently viewing निर्लेखित जडसंग्रह साहित्य विक्रीसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

निर्लेखित जडसंग्रह साहित्य विक्रीसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

निर्लेखित जडसंग्रह साहित्य विक्रीसाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शासकीय तांत्रिक विद्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पध्दतीने विक्री करावयाची आहे. साहित्य ज्या खरेदीदारास विकत घ्यावयाचे आहे, त्यांनी दि. 30 मे  रोजी  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  कार्यालयात सिलबंद लिफाफ्यात दरपत्रक सादर करण्याचे आवाहन  शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्राचे  प्राचार्य यांनी केले आहे.

             निविदेच्या बंद लिफाफ्यावर स्वच्छ अक्षरात साहित्य घेणाऱ्यांचे नांव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. 30 मे नंतर आलेल्या निविदांच्या स्विकार केला जाणार नाही. 31 मे रोजी सकाळी 11 वाजता उघडण्यात येतील. ही विक्री करावयाचे निर्लेखित जडसंग्रह साहित्य या कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 10.30 ते 5 वाजेपर्यंत पाहता येतील  तसेच कामाचे कोटेशन संस्थेच्या भांडारमध्ये सुट्टीचा दिवस वगळून कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाहता येईल. या निर्लेखित जडसंग्रह साहित्य आहे त्या स्थितीत आपल्या स्वखर्चाने नेण्याची व्यवस्था करावी.

अटी पुढीलप्रमाणे :- ज्या खरेदीदाराच्या साहित्याचा दर जास्त असेल अशा पात्र खरेदीदारास सदरह साहित्याची विक्री केली जाईल. ज्याचा दर मंजूर होईल त्यांना ताबडतोब योग्य रक्कम भरुन साहित्य स्वखर्चाने घेवून जावा लागेल. कोणतीही निविदा राखुन ठेवण्याचा विक्री रद्द करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुखांना राहील. कोणतेही दरपत्रक स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मुख्याध्यापकांनी राखून ठेवले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा