*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पानावरील दवबिंदू*
झुंजुमुंजू होताच
पहाट किरण स्पर्शतात
दवबिंदू थरथरतात
पानांवर….
हिरव्या तजेलदार
पानांवर होती गोळा
सुंदर सोहळा
दृष्टीपुढे….
थेंब दवाचे
मोती जणू भासतात
तेजस्वी चमकतात
टपकतांना…..
किरणांनी दवबिंदू
सप्तरंगात सुंदर दिसतात
मोहक हसतात
प्रभाती……
पानावर चमकत
दवबिंदू पडतो भुईवर
आयुष्य क्षणभर
आनंदाने…..।।
💧🌺🍃🍃🍃🌺💧
अरुणा दुद्दलवार@✍️
