You are currently viewing महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम गतिमानरित्या

महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम गतिमानरित्या

आम. निलेश राणे सातत्याने संपर्कात; मालवण उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांची माहिती

मालवण :

वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे मालवणसह अनेक भागांत नुकसान झाले. वीज खांब व तारा तुटून नुकसान झाले. सबस्टेशन मालवण, आचरा, कुंभारमठ, पेंडुर या माध्यमातून होणारा वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम गतिमानरित्या MSEB मार्फत सुरु आहे. आमदार निलेश राणे सातत्याने संपर्कात असल्याचे मालवण उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांनी सांगितले. दरम्यान, काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तसेच संततधार पाऊस यामुळे कामात अडथळा निर्माण होत होता. तळेबाजार, आचरा सबस्टेशनं मार्गे येणारा पुरवठा सुरु होत आहे. कुडाळ येथून येणाऱ्या मार्गांवर वीज खांब कोसळून व तारा तुटून मोठे नुकसान झाले. तेही पूर्ण करण्याचे काम प्रगतीत आहे. MSEB कडून काम सुरु असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे सचिन म्हेत्रे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा