भाजपा मालवण तालुकाध्यक्ष विष्णू मोंडकर यांची मागणी
मालवण :
मालवण सब स्टेशनला 3 फीडर वरून सप्लाय आहे. कुडाळ, आचरा आणि विरण येथून सुविधा उपलब्ध असतेवेळी पण एकाच वेळी तिन्ही फीडर काही ना काही कारणामुळं बंद पडतात. गेली पाच दशके कुडाळ वरून मालवणला सप्लाय असायचा त्यावेळी एवढा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत नव्हता. आता तिन्ही बाजूनी सप्लाय असूनही मालवण शहर कायम अंधारात असतो.
मालवण तालुका हा व्यावसायिक, पर्यटन दृष्ट्या विकसित होत असून व्यावसायिक वापरासाठी उच्चदाब उपकेंद्राची आवश्यकता आहे. या विषयी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. काल खंडित झालेल्या विजेमुळे पर्यटन व्यावसायिकांचे एंन हंगामात आर्थिक नुकसान झाले. होमस्टे लॉजींग बोर्डिंग धारकांना रात्री होम स्टे लाईट अभावी रूम सोडावे लागले. अनेक व्यावसायिकाचे आईस्क्रीम, मासे नुकसान झाले. कमी होल्टेज तिन्ही फिडर वरून लाईट मालवण सब स्टेशन ला येताना सरासरी 30 ते 35 किलो मीटर वरून पोचते. त्यामुळे त्याचा होणारा मेंटेनंस त्यामुळे दरवर्षी 10 लाखा पेक्षा जास्त पर्यटक तसेच व्यावसायिक उलाढाल असलेला मालवण शहर, तारकर्ली, वायरी, देवबाग परिसरातील व्यावसायिकांना कायम स्वरूपी सामोरे जावे लागते.
मालवण शहरात उच्चदाब उपकेंद्र उभारल्यास लाईन टॉवर वरून येऊन लाईट मेंटेनंस कमी होईल लो होल्टेज चा त्रास संपून मालवण लाईट ची मूलभूत गरज मार्गी लागेल. भारतीय जनता पार्टी म्हणून मालवण शहरासाठी उच्चदाब उपकेंद्र होण्यासंदर्भात सात्यत्याने आम्ही प्रयत्नशील असून सदर विषयी प्रस्ताव sdl व कार्यालयीन टिप्पणि सह उपकार्यकारी अभियंता मालवण यांनी कार्यकारी अभियंता कणकवली यांना पाठविला असून त्या प्रस्तावास महापारेषण करून मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आणि नितेश राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी या गंभीर विषयाकडे गांभीयपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे आणि हे उच्चदाब उपकेंद्र उभारावे. तसेच गेल्या दहा वर्षांत माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत यांनी ह्या समस्येवर गांभीर्याने न बघितल्याने ही समस्या प्रलंबित राहिली नंतर मालवण सब स्टेशन मूलभूत गरजेसाठी वंचित आहे ही खेदजनक बाब आहे. लवकरच या विषयी पालकमंत्री यांची भेट घेऊन या विषयी मार्ग काढणार अशी माहिती विष्णू मोंडकर भाजपा तालुकाध्यक्ष मालवण यांनी दिली.

