You are currently viewing फोंडाघाट महाविद्यालयात विविध दाखले शिबिर संपन्

फोंडाघाट महाविद्यालयात विविध दाखले शिबिर संपन्

फोंडाघाट महाविद्यालयात विविध दाखले शिबिर संपन्

फोंडाघाट

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय- फोंडाघाट मध्ये विविध शासकीय दाखले शिबिर संपन्न झाले. शिक्षण घेत असताना, नोकरी करत असताना आपल्याला दाखल्यांची आवश्यकता असते.ते मिळवण्यासाठी लागणारे श्रम व पैसा वाचवण्यासाठी “शासन आपल्या दारी ” योजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘शाळा तेथे दाखले’ ही मोहीम राबवण्यात येत आहे.

 

 

 

 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नायब तहसीलदार श्री. गंगाराम कोकरे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ.

पुरंदरे नारे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या दाखल्याच्या सोयीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिष्यवृत्ती मिळत असताना, दाखला मिळवताना येणारे अडचणीचे काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे. याचा उपयोग करून घेतला पाहिजे.त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

 

 

 

आपल्या मनोगतात नायब तहसीलदार श्री. गंगाराम कोकरे म्हणाले की,फोंडाघाट येथे शाळा तेथे दाखले उपक्रम राबवताना आनंद यासाठी होतो की, त्यामुळे अनेकांचे श्रम व पैसा वाचणार आहे. हा उपक्रम अत्यंत वेगाने करत आहोत. या उपक्रमाला उत्कृष्ट सहकार्य लाभते. त्यामुळे कणकवली तहसीलला कोकण विभागात दुसरा क्रमांक मिळाला आहे. शाळा तिथे दाखले हे नाविन्यपूर्ण योजना कणकवली तहसील यांनी राबवली आहे. दाखला मिळवण्यासाठी येणारी कटकट नकोशी असते.यासाठीच हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. हे दाखले मिळवत असताना सोपेपणा मिळावा म्हणून हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

 

 

संस्थेचे चेअरमन मा.श्री.महेश सावंत म्हणाले की,शासकीय योजनांचा लाभ मिळवणे आवश्यक आहे. याचे दाखले मिळवत असताना येणाऱ्या अडचणींना फाटा मिळावा म्हणून आमच्या संस्थेने शाळा तिथे दाखले उपक्रम राबवला. आहे. विद्यार्थीभिमुख कारभार करणे हा आमच्या आमच्या संस्थेचा हेतू असतो. दाखले काढण्यासाठी उदासीनता ही गंभीर बाब आहे. प्रत्येक दाखला महत्त्वाचा असतो. तो मिळवण्यासाठी सोपेपणाने मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. असे प्रतिपादन केले.

 

 

 

कार्यक्रमाला नायब तहसीलदार श्री. गंगाराम कोकरे,महसूल अधिकारी श्री. दिलीप पाटील, माजी विद्यार्थी श्री. संभाजी राणे, श्री.जयवंत मांगले, श्री. मालडीकर, मंडळ अधिकारी प्रवीण मोंडे, फोंडा तलाठी सावंत,परिसरातील सर्व तलाठी, पोलीस पाटील, तसेच सेतू केंद्राचे श्री. गणेश तेली, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.शिबिरात ४० पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश कामत यांनी, प्रास्ताविक डॉ. बालाजी सुरवसे तर आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले…..


प्रतिक्रिया व्यक्त करा