You are currently viewing भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ सावंतवाडीत उद्या सर्वपक्षीय तिरंगा यात्रा….

भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ सावंतवाडीत उद्या सर्वपक्षीय तिरंगा यात्रा….

भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ सावंतवाडीत उद्या सर्वपक्षीय तिरंगा यात्रा….

सावंतवाडी

देशाच्या सीमेवर अहोरात्र झटणाऱ्या भारतीय सुरक्षा दलांच्या शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी सावंतवाडी शहरात उद्या, २१ मे ला सायंकाळी ४ वाजता तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा गांधी चौक येथील भारत माता हॉटेलपासून सुरू होईल.

“ऑपरेशन सिंदूर” च्या यशस्वी कारवाईनंतर भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटना आणि सावंतवाडीतील नागरिक सहभागी होणार आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांना या यात्रेत सहभागी होऊन भारतीय सैन्यदलांप्रती आपला अभिमान व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा