*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मुखवटे …*
घेऊन मुखवटा हे सारेच चालतात
केव्हातरी पितळ पडणार उघडे आहे..
फासून ती निळाई कोल्हा हा होत नाही
कळणार ना गध्यास हे निखळ सत्य आहे..
सीमेवरी न जाता येथेच कोल्हेकुई
औकात जाणतात जनता पहात राही..
वल्गना डरकाळ्या समुहात त्या करूनी
दिल्लीस पाठवा हो हवाच निघूनी जाई..
ज्या भलेबुरे न कळते हत्तीस भुंकतात
गजराज ऐरावत वळूनीही पहात नाही..
गल्लीत भुंकणारे वेशीवरी न जाती
तुम्ही लढा म्हणतात फुसक्याच असती वाती..
नेहमीच फुसके बार हे भद्द वाजणार
घरका न घाटका हे निर्दयी पार गद्दार…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
