You are currently viewing सिंधुदुर्ग कृषी सहाय्यक संघटनेचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन…

सिंधुदुर्ग कृषी सहाय्यक संघटनेचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन…

सिंधुदुर्ग कृषी सहाय्यक संघटनेचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी

कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना सिंधुदुर्ग च्या वतीने आज अधीक्षक कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधले असतानाही मागण्या पूर्ण न झाल्याने आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक कृषी कार्यालयासमोर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकानी सकाळपासून धरणे आंदोलन केले . कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष बालाजी वाघमोडे ,सचिव अमृता राणे, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आजच्या धरणे आंदोलनात राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर कदम,संघटनेचे पदाधिकारी गणेश राठोड, पुनम कोलते, लाडू जाधव, साक्षी बांदेकर यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कृषी सहाय्यक सहभागी झाले होते.

आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले आहेत. यामध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहाय्यकांचे पद नाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्याने कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावा, कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्यावा, कृषी विभागाच्या आकृती बंधास तात्काळ मंजुरी द्यावी व त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक यांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नती मधील त्रुटी दूर कराव्यात. या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांकडे अधीक्षक कृषी अधिकारी यांचे लक्ष वेधले आहेत.

 

अन्यथा खरीप हंगाम निविष्ठा वाटपावर बहिष्कार कृषी निविष्ठा वाटपा संदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यामध्ये सुसूत्रता येत नसून कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये विविध योजनेत कृषी सहाय्यक यांना वाहतूक भाड्याची तरतूद करावी किंवा निविष्ठा वाटप परमिटद्वारे करावे अन्यथा खरीप हंगाम २०२५ मधील निविष्ठा वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल. असा इशारा या निवेदनाद्वारे कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष बालाजी वाघमोडे यांनी प्रशासनास दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा