You are currently viewing लोकराजा संघ पदाधिकारी नियुक्ती समारंभ संपन्न

लोकराजा संघ पदाधिकारी नियुक्ती समारंभ संपन्न

ठाणे :

ठाण्यातील राज्यव्यापी लोकराजा संघाचा नाशिक येथील प्रतापगड विश्रामगृह येथे नियुक्ती समारंभ रविवारी संपन्न झाला.

ठाण्यातील लोकराजा चॅनेलचे संपादक यांनी, राज्यव्यापी लोकराजा संघातर्फे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, अशा विविध क्षेत्रात कार्य करत असताना लोकराजा संघाने रविवार दि. १८/०५/२०२५ रोजी नाशिक येथील प्रतापगड विश्रामगृह या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामधील जयप्रकाश लक्ष्मण बोरसे यांनी लोकराजा संघामध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे कार्य पाहून त्यांना अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षपदी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीकांत रामराव नाथे यांना अमरावती जिल्हा अध्यक्ष आणि आकाश रामचंद्र सोरटे यांना सातारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लोकराजा संघाचे प्रमुख आयु. भुजंगराव सोनकांबळे यांनी शुभेच्छा देऊन, या सर्वांना नियुक्तीपत्रे प्रधान केली आहेत. या तीन प्रभुतींच्या हातून समाजातील प्रत्येक वंचित घटकातील सर्व बंधू-भगिनींना यथाशक्ती न्याय मिळवून देता यावा. त्यातून त्यांनी खऱ्या अर्थाने लोककल्याण साधावे. अशी अपेक्षा भुजंगराव सोनकांबळे यांनी व्यक्त केले आहे.

त्याप्रसंगी लोकराजा संघाचे प्रमुख (अध्यक्ष) आयु. भुजंगराव सोनकांबळे, सचिव नंदकुमार रामदास उपाध्यक्ष भूपेंद्र बागूल आणि लोकराजा संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. लोकराजा संघाचे संस्थापक अध्यक्ष भुजंगराव सोनकांबळे हे ठाण्यातील समाजसेवक, पत्रकार म्हणून कार्य करतात. ते लोकराजा टीव्ही न्यूज चॅनेलचे (युट्युब चॅनेल) संपादक म्हणून आपली सामाजिक भूमिका यथार्थपणे बजावत असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा