इन्सुली उपसरपंचपदी नमिता नाईक यांची बिनविरोध निवड…
बांदा
इन्सुली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नमिता नंदू नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वर्षा सावंत यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज नमिता नाईक यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी शिक्षण आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, बांदा भाजपा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन नाईक यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती सौ. मानसी धुरी, माजी सरपंच विठ्ठल पालव, विकास संस्था चेअरमन सामाजिक परब, माजी चेअरमन हरिश्चंद्र तारी, अशोक सावंत, उमेश पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता खडपकर, वर्षा सावंत, महेश धुरी, महेंद्र पालव, प्रताप सावंत, संजय सावंत, अमेय कोठावळे, नागेश सावंत, औदुंबर पालव, नंदू नाईक श्री सावंत आदी उपस्थित होते.
