सावंतवाडी
युवा नेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल आज सिंधुदुर्गात सावंतवाडी भाजपाच्यावतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत जल्लोष साजरा केला.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब,भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, युवा नेते विशाल परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, प्रमोद कामत, मोहिनी माडगावकर,परिणीता वर्तक, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, बाबू सावंत, दिलीप भालेकर, गणेश प्रसाद पेडणेकर, संजू विरनोडकर, बंटी पुरोहित, केतन आजगावकर, संजय वरेरकर आदी उपस्थित होते.