You are currently viewing कवयित्री पल्लवी उमरे यांच्या “कॅनव्हास” काव्यसंग्रहाला “काव्यगौरव” पुरस्कार प्राप्त

कवयित्री पल्लवी उमरे यांच्या “कॅनव्हास” काव्यसंग्रहाला “काव्यगौरव” पुरस्कार प्राप्त

*कवयित्री पल्लवी उमरे यांच्या “कॅनव्हास” काव्यसंग्रहाला “काव्यगौरव” पुरस्कार प्राप्त*

 

*वैशाखी वादळ वारा काव्यमहोत्सवात वितरित होणार पुरस्कार*

 

 

मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिका पल्लवी उमरे यांच्या “कॅनव्हास” या काव्यसंग्रहाला विश्वरत्न इंग्लिश मिडिअम स्कूल विष्णूपंत ताम्हणे विद्यालय चिखली पुणे यांचे तर्फे काव्यगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा या संग्रहाला मिळालेला तिसरा पुरस्कार आहे. कवी चंद्रकांत जोगदंड आयोजित वैशाखी वादळ वारा काव्यमहोत्सव, नवीपेठ, पुणे येथील ८ जून २०२५ रोजी होणाऱ्या खुल्या कवी संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पल्लवी उमरे लिखित कॅनव्हास रंगतरंग मनाचे हा पहिलाच काव्यसंग्रह २०२१ साली प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रहाला आतापर्यंत राज्यस्तरीय दोन पुरस्कार,, मराठी साहित्य मंडळाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, आणि आता विश्वरत्न इंग्लिश मिडिअम स्कूल, विष्णूपंत ताम्हणे विद्यालय चिखली पुणे तर्फे काव्यगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कॅनव्हास काव्यसंग्रहात सामाजिक, राजकीय,प्रेम काव्य,निसर्गावर आधारित

अष्टाक्षरी, वृत्तबद्ध कविता, अभंग, गवळण, गझल, मुक्तछंद, भक्तीमय रचना अशा ९४ कवितांचा समावेश आहे.

“प्याक्तनाने बहर आपला

थोपवावा तरी किती

फुलांचे अर्ध्य मागण्या

जेव्हा आतुर झाली माती”

अशा नेमक्या शब्दांत प्रसिद्ध लेखिका विजयाताई मारोतकर यांची प्रस्तावना आणि पाठबळ लाभले आहे. लेखिकेने आपले सुखदु:खाचे कवडसे, आशावाद, अनुभवविश्व, नविन दृष्टी, विद्रोही काव्य तर कुठे प्रेमकाव्याचे तलम वस्त्र नजाकतीने विणत, काव्यफुलांची ओंजळ रसिकांना समर्पित केली आहे. हेच या पुस्तकाचे खरे यश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा