You are currently viewing शहाणा कुणी ना होई…

शहाणा कुणी ना होई…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शहाणा कुणी ना होई…*

 

गर्तेमध्ये जातो माणूस तरी खंतच नाही

जीतेपणी तो मरतो आहे बाकी काही नाही…

 

मरण्याआधी सामानाची जुळणी करत राही

मेला तरीही स्मरत नाही बाकी काही नाही…

 

कळते पण का वळत नाही खंत पोखरे मना

मणीच सारे एका माळेचे बाकी काही नाही..

 

लोका सांगे ब्रह्मज्ञान तो स्वत: कोरडा राही

रीतच आहे जगताची ही बाकी काही नाही…

 

मी बरोबर मीच शहाणा वेड्यांच्या बाजारी

वासरात ती गाय शहाणी बाकी काही नाही…

 

अंत दिसे जगताचा आता करू न शकतो काही

उघड्या डोळ्यांनी बघणे हो बाकी काही नाही…

 

सारे प्रवासी घडीचे असतां लोभ सुटतच नाही

सगळे येथे सुटून जाईल बाकी काही नाही…

 

पुण्याचे ते गाठोडे हो रोखच घेऊन जावे

देवेंद्र तो न्यावयास ये बाकी काही नाही…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा