You are currently viewing पावसाळ्यात वीज सेवा सुरळीत ठेवा : जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर

पावसाळ्यात वीज सेवा सुरळीत ठेवा : जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर

पावसाळ्यात वीज सेवा सुरळीत ठेवा : जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर

मालवण येथे वीज ग्राहक संघटनेची बैठक संपन्न_

*मालवण*

पावसाळ्यापूर्वी मालवण तालुक्यातील वीज सेवा सुरळीत व्हावी यासाठी वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग व वीज ग्राहक संघटना मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने उपकार्यकारी अभियंता उपविभाग मालवण कार्यालयात अभियंता श्री.माळी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
मालवण तालुक्यात असलेल्या समस्या, गंजलेले विद्युत पोल, वीजकाम पावसाळ्यापूर्वी वाढलेली झाडेझुडपे, विद्युत लाईनवरील साफसफाई बाबत माहिती वीज विभागाला देण्यात आली. यावेळी अभियंता श्री.माळी यांनी विद्युत विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्यावरील सर्व झाडेझुडपे साफसफाई करण्यात यावी , गंजलेले विद्युत पोल तथा वाकलेले विद्युत पोल बदलण्यात यावे, आवश्यक असलेल्या ठिकाणी विद्युत पुरवठा अखंडित राहणार नाही यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आदेश यावेळी देण्यात आले.
यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता कणकवली श्री.माळी, उपकार्यकारी अभियंता मालवण श्री.मित्रे, सहायक अभियंता श्री.मयेकर, कनिष्ठ अभियंता राहुल केकण, अभियंता हरीश कांबळी, जिल्हा कार्यकारणी सदस्य तुकाराम म्हापसेकर, नितीन तायशेटे, सौ‌पूनम चव्हाण, देवानंद लुडबे, महेश अंधारे, अजित गवंडे महेंद्र म्हाडगूत, अनिल गवंडे, भालचंद्र राऊत, रवींद्र तळशीलकर, रमण आंबेडकर, भालचंद्र राऊत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा