*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”सिंदूर”*
सिंदूर हिंदुस्तानी नारीचे सात्विक दर्शन
पतीचे आयुष्य कुटुंब रक्षणाचे वचनIIधृII
सिंदूर वृक्षांचे बियापासून बने सृष्टीचे देणं
बनतो हळद नैसर्गिक रंग चून्या पासून
आरोग्यदायी शिरातील रक्त प्रवाह बने शुद्धII1II
सौभाग्य प्रेम पति पत्नीतील नाते अतूट
धार्मिक महत्त्व सिंदूर आहे सौंदर्य प्रसाधन
रक्तरंजित रंग देई त्याग धैर्य शिकवणII2II
हिंदुस्तानी नारीचे शृंगार सौभाग्य लक्षण
सिंदूर करी स्त्रीत्वाचे भावनांचे रक्षण
स्त्रीचा अढळ विश्वास करी संस्कृतीचे पालनII3II
अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देई बळ
रक्तवर्णीय रंग शौर्य बलिदानाचे बोधचिन्ह
भारतीय सैन्याचे वाढवी धैर्य देई प्रोत्साहनII4II
सिंदूर भारत मातेच्या मस्तकावरील आभूषण
सूर्योदय सूर्यास्ताचे लाल दर्शन स्फूर्ती पूर्ण
भारत मातेच्या रक्षणार्थ सैन्य करी बलीदानII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
