*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काही चुकलं का?*
मनापासून स्वतःशीच बोलतो
परिक्षणासाठी माझ्या मी निक्षून |
अहंकारासाठी माझ्या दुखावतो
का कधी मी असा सज्जना लक्षून ||१||
दावू कसा व्यवहारीक जगाला
माझ्या वागण्याने अशा मी सत्यता |
का असा त्यांच्या मी जीवनात येऊ
मी कधी त्यांच्या विचारात नसता ||२||
भाव-ना विचारी मला का एकदा
कुणी भाव देई मला का एकदा |
अपेक्षा सोडून पहावे एकदा
सकल सुंदर हो सदा सर्वदा ||३||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,
जि.- सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.
