*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आता नाही थांबणार*
पेटून उठला आहे भारत
नाही थांबणार आता नाही थांबणार॥धृ॥
अहिंसेचे आम्ही उपासक
मानवता धर्माचे रक्षक
गनिमांचा अन्याय परि
आम्ही नाही साहणार
आता नाही थांबणार॥१॥
माता भगिनी बंधू अमुचे
जगती जीवन सामान्यांचे
सूडावाचून आतंक्यांना
बलशाली भारत नाही आकळणार
आता नाही थांबणार॥२॥
शिवाजी राजा महाराष्र्टाचा
वीर पुरुष तो पराक्रमाचा
मायभूमीचे रक्षण करण्या
प्राण पणाला लावणार
आता नाही थांबणार॥३॥
मिटवू आम्ही या शत्रूला
नेस्तनाबुत करूच त्यांना
सीमेवरचे सैनिक अमुचे
माघार नाही घेणार
आता नाही थांबणार॥४॥
स्वयं उतरले भगवंत
केले पार्थाचे सारथ्य
संहार करण्या दुष्टांचा या
वासुदेव अवतरणार
आता नाही थांबणार॥५॥
अरुणा मुल्हेरकर
११/०५/२०२५

