*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कां? कुणा दोष द्यावा*
********************
कां ? उगा कुणा दोष द्यावा
चूक आपली झाली असता….
मनभावनांचे नातेच बेगडी
हेची सत्य या जगीचे आता….
प्रेमभावास्थाच व्यर्थ आज
हे जाणुनीया जगावे आता….
जे जे घडते ते ऋणानुबंधी
मानावे भाळीचा योग होता….
सारेसारे जरी असले आपुले
तरीही विवेकी वागावे आता….
कां ? उगा कुणा दोष द्यावा
चूक आपली झाली असता…
***********************
*..( 41 )*
*©️वि.ग.सातपुते. (भावकवी )*
*📞( 9766544908)*
