यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीप्रमाणे:- लाभार्थी धनगर कुटुंबातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या मुळ प्रवर्गातील असावा. लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे. लाभार्थी कुटुंबाचे स्वात:चे मालकीचे घर नसावे. लाभार्थी कुटुंब हे भूमिहीन असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.या योजनेचा लाभ पात्र कुंटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
