पुणे :
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावी बोर्डाचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या 13 मे रोजी मंगळवारी दुपारी 1 वाजता दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांच्या मार्कशीट्स अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in द्वारे तपासू आणि डाउनलोड करू शकतात.गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. या निकालाची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.
अखेर मंगळवारी 13 मे रोजी महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in, mahresult.nic.in वर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील.
या वेबसाइटवर पाहता येईल निकाल
1. https://www.mahresult.nic.in2.
2. https://sscresult.mkcl.org3.
3. https://ssc.mahresults.org.in
4. https://results.digilocker.gov.in
5. https://sscresult.mahahsscboard.in
6. http://sscresult.mkcl.org
