You are currently viewing गोवर्धन गोशाळेने प्रेरित होऊन उद्योजक निर्माण व्हावेत – खासदार नारायण राणे

गोवर्धन गोशाळेने प्रेरित होऊन उद्योजक निर्माण व्हावेत – खासदार नारायण राणे

कणकवली :

गाय म्हणजे प्रगती..गायीला आपण माता मानतो. मागील तीन वर्षे करंजे येथील माळरानावर आम्ही गोवर्धन गोशाळेची मुहूर्त मेढ रोवली. आज गोशाळेत देशातील दीडशे विविध जातीच्या गायी आहेत. कोणती गाय किती लिटर दुध देते. कोणत्या गायीचे तूप चढ्या दराने विकले जाते याचे मार्गदर्शन येथे मिळणार. शेण शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलो आणि गोमूत्र 8 रुपये लिटर दराने विकत घेणार आहोत. शेणापासून रंग, शेणखत, तसेच विविध उत्पादन घेणार आहोत. जिल्ह्याचे दरडोई असलेले अडीच लाखांचे उत्पन्न वाढावे यासाठी राणे कुटुंबाचा प्रयत्न आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, जिल्ह्यात आय ए एस, आय पी एस सह प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या गोवर्धन गोशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यावसायिकांनी प्रेरणा घेऊन दुग्ध व्यवसायात उतरावे असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी गोवर्धन गोशाळा उदघाटन प्रसंगी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा