मालवण
‘गोडया पाण्यातील माशांचा डी.एन.ए’ या विषयावर मिलिंदकुमार खरात यांनी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठास सादर केलेल्या प्रबंधासाठी मिलिंदकुमार यांना विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. मिलिंदकुमार खरात हे मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. एम. पी. खरात यांचे सुपुत्र आहेत. मिलिंदकुमार खरात यांना शिवाजी महाविद्यालय अकोला येथील प्रा. डॉ. पी. पी. अडे यांचे मार्गदर्शन लाभले. मिलिंदकुमार खरात यांचे माध्यमिक शिक्षण भंडारी हायस्कूल मालवण येथून झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण टोपीवाला हायस्कूल येथून झाले. महाविद्यालयीन बी.एस.सी. चे शिक्षण त्यांनी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथून पूर्ण केले तर पदवीत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून केले. मिलिंदकुमार खरात सध्या औरंगाबाद येथील स्थानिक कोविड सेंटर मध्ये सहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत आहेत. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. कैलास राबते यांचे कडून त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन, प्रेरणा व मार्गदर्शन लाभले. पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल मिलिंदकुमार खरात यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.