पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मंजूर झाले मंडपाचे काम
कणकवली वासियांनी उपस्थित राहण्याचे कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने आवाहन
कणकवली:
परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर जिल्हा वार्षिक योजना पर्यटन अंतर्गत पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केलेल्या निधीतून कायमस्वरूपी मंडप उभारण्यात येणार आहे. या मंडपाचे भूमिपूजन गुरूवार २८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. पालकमंत्री उदय सामंत आणि परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश उर्फ पी.डी.कामत यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्याला खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शिवसेना नेते संदेश पारकर, कणकवलीचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हया पारकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.