*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नातं….गुलाबांसोबतचं…!!*
खुळ्या सोनेरी उन्हांत
आयुष्यात दोस्ती जडली
अवघ जगणं रंगारंग
मनाची दार उघडली ..!
धरणीवर नक्षत्रांचा झुला
गंधर्वांनी माझ्या हातून बांधला
सोनवर्खिले झुंबर लेवून
हिरवंपर्णी गुलाब सजविला..!
निरागस उन्मत गंध
केव्हाही भेटाया मला येतो
दुःखात पिळवटून रडत रडत
खळखळून मला हसाया लावतो ..!
अवचित हळव्या क्षणी
अद्वैत साधून ..ह्दयांत शिरतो
गीताईचे… गुणगुणत श्लोक
भूलोकी माझ्यात अवतरतो ..!
पीतांबर नेसून युगंधर
साज पाचूचा चढवतो
रक्ताचं नात नसूनही
अग्नीसमक्ष नात जगतो ..!
जवळची नाती दूर …गेली
गुलाबा रे..तूच मला सावरलं
आता ..काळालाच ठरवू दे
कोण कोणाच्या आधी गेलं!!
बाबा ठाकूर