*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तारतम्य….*
तारतम्य जीवनी असावे आहे परवलीचा शब्द
नियम काही पाळती तयांवर दुनिया होते लुब्ध…
भरकटणारी नौका जीवन नसेल जर का सुकाणू
लवचिक असावे जीवन आपले नकाच त्याला ताणू…
लवचिक असावे नेहमी आपण काळानुसार बदलू
दोन पाऊले मागेपुढे व्हा, म्हणणे नकाच लादू…
नाही पटले जरी तुम्हाला तारतम्य सांभाळा
नव्या पिढीचे म्हणणे ऐका करू नका कंटाळा…
ज्यांना कळते तारतम्य हो सुटत नाही तोल
खूणगाठ बांधाच मनाशी जीवन हे अनमोल…
कळले नाही तारतम्य ते प्रलयी वाहून जाती
सोन्यासारख्या आयुष्याची होते पहा मग माती..
पाळा पाळा प्रत्येकाने तारतम्य सांभाळा
जीवनातले अनुभव ही आहे मोठी “शाळा”…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
