You are currently viewing स्पर्ष अचेतनी

स्पर्ष अचेतनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्पर्ष अचेतनी*

〰️〰️〰️〰️〰️

कां ? उगा स्मरावे भूतकाळा

सांग आज उरले काय आता

 

हरविले सारे सारे ऋणानुबंध

व्याकुळ भावनांना बांध आता

 

लोचनी ओघळ सुन्न आसवांचे

सांगा कसे जीवा सावरु आता

 

भावनांचाही जाहला पाचोळा

तरी नाही कुणा कुणाची चिंता

 

जो , तो भौतिक सुखात रमला

भावस्पर्ष सारेच अचेतन आता

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*( 32 )*

*©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞(9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा