प्राधिकरण, निगडी-
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाची २०२५-२०२६ या वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी आनंदराव मुळूक, उपाध्यक्ष अलका बेल्हे, कार्याध्यक्ष दिलीप गोसावी, कोषाध्यक्ष विलास बेल्हे करून व कार्यकारिणीतील इतर पदांचे वाटप करण्यात आले.
अध्यक्ष मुळूक चासकमान येथील रहिवासी असून, ग्रीव्हज कौटन कंपनी (डिझेल इंजिन युनिट) चिंचवड येथे ३८ वर्षे नोकरी करून, १मार्च २०१२ रोजी वयाच्या साठाव्या वर्षी सेवा निवृत्त झाले. त्यांनी
सेवा निवृत्तीनंतर *हास्यरंग* हा विनोदी एकपात्री कार्यक्रम वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिक संघात, शाळेत, कोजागिरी पौर्णिमेला, वृध्दाश्रमात सादर केला आहे. मिळालेले मानधन तेजगुरु सरश्रींचे मनन आश्रम कार्यासाठी दान देत आहेत. समाजाकडून घेऊन समाजाला परत देत आहेत. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघात २०१४ आक्टोबर मध्ये हास्यरंग कार्यक्रम सादर केला व दोन महिन्यात संघाचा सभासद झाले. २०२२मध्ये त्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांना कविता लेखनाची आवड आहे. वेगवेगळ्या काव्य संमेलनात त्यांनी कविता सादर केल्या आहेत. स्वाध्याय परिवारात कृतीशील कार्यकर्ता म्हणून काम केले आहे.
या पदावर काम करताना ज्येष्ठांच्या समस्या निवारणासाठी प्रयत्न करणार, कागद खर्च कमी करून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी मदत करणार आहे. असे त्यांनी सांगितले.
