पाण्याचा अंदाज न आल्याने मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू:कारिवडे येथील घटना
सावंतवाडी
तालुक्यातील कारीवडे येथील युवक मासेमारी साठी नदीत गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी घडली,मृत झालेल्या युवकाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
