You are currently viewing बांदा-मळेवाड ते आजगाव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू… . बांदा

बांदा-मळेवाड ते आजगाव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू… . बांदा

बांदा-मळेवाड ते आजगाव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू…
.
बांदा

मळेवाड-चराटकरवाडी ते आजगाव-सावरदेव देवस्थान या दरम्यानच्या खराब झालेल्या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण अखेर सुरू झाले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. वाहनधारकांना आपले वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. त्यातच रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे अनेक छोटे-मोठे अपघातही झाले होते. या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे की काय? असा संतप्त सवाल वाहनधारक आणि पादचारी विचारत होते.

सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पर्यटन जिल्हा असून येथे वर्षभर अनेक पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, या खड्डेमय रस्त्यांमुळे पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी वाहनचालक, पादचारी आणि ग्रामस्थ सातत्याने करत होते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची दखल घेतली असून, या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम तसेच संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालक, पादचारी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लवकरच हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी सुस्थितीत येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा