You are currently viewing केंद्रिय सैनिक बोर्डचे संकेतस्थळ अद्यावतीकरणाची प्रक्रीया सुरु

केंद्रिय सैनिक बोर्डचे संकेतस्थळ अद्यावतीकरणाची प्रक्रीया सुरु

केंद्रिय सैनिक बोर्डचे संकेतस्थळ अद्यावतीकरणाची प्रक्रीया सुरु

सिंधुदुर्ग,

 जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की के. एस. बी. (Kendriya Sainik Board) ला ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे संकेतस्थळ (Web Site) अद्यवत करण्याचे काम सुरु असल्यामुळे हे संकेतस्थळ पुढील दोन महीने बंद राहणार आहे.

जिल्ह्यातील संबधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांना के. एस. बी. प्रणालीव्दारे सन २०२४-२५ ची त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक प्रकरणे व इतर अर्ज हे संकेतस्थळ (Web Site) बंद असल्याने पुढील दोन महीने ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करता येणार नाही. संकेतस्थळ (Web Site) सुरु झालेनंतर या कार्यालयाकडुन आपणास वेळेत कळविण्यात येईल. तसेच अर्ज सादर करण्यासाठीचा कालावधी वाढवुन देण्यात येईल. त्यामुळे कोणताही संभ्रम निर्माण करुन घेऊ नये.

तरी पात्र माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी याची नोंद घ्यावी व या कार्यालयाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४/८२१९२८५७८८ वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा